अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री नृसिंह विद्यालय चास या ग्रामीण भागातील शाळेला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. रमेशकुमार पोला, मुन्नांगी श्रीकर राजू व बाळासाहेब बोरकर यांच्या हस्ते जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष रा.ह. दरे, संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे, विश्वस्त मुकेश माधवराव मुळे व मुख्याध्यापक सुनील अकोलकर यांना आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकनचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष रा.ह. दरे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ज्ञानगंगा ग्रामीण भागातील दारोदारी आणून शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठा विद्या प्रसारक समाजाचे आपली छाप उमटवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सक्षम व गुणसंपन्न होण्यासाठी संस्थेचा ध्यास असून, त्या दिशेने वाटचाल सुरु आहे. श्री नृसिंह विद्यालयाने या कार्यासाठी आपले योगदान सिध्द केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अद्यावत शिक्षणाची गरज आहे. यासाठी इतर शाळांनीही आयएसओ मानांकन प्राप्त करण्याचे त्यांनी आवाहन केले. मुकेश माधवराव मुळे यांनी शैक्षणिक क्रांतीसाठी संस्थेच्या ग्रामीण भागातील शाळाही सज्ज झाल्याचा विश्वास व्यक्त केला.
मुख्याध्यापक सुनील अकोलकर यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. रमेशकुमार पोला व मुन्नांगी श्रीकर राजू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आंतरराष्ट्रीय मानांकनाबद्दल सविस्तर माहिती दिली. सुभेदार मेजर बाळासाहेब बोरकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी सुभेदार मेजर रावसाहेब भोर, सरपंच अॅड. राजेंद्र गावखरे, राधाकृष्ण वाळुंज यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पोपटराव घुंगार्डे, माजी मुख्याध्यापक सुधीर काळे, अर्जुन भांगे, रमेश गवळी, चंद्रकांत भवर, माजी शिक्षणाधिकारी मनोहर खांदवे, श्रीकांत कातोरे, सिकंदर सय्यद, उपसरपंच युवराज कार्ले, पै. रावसाहेब कार्ले, जयसिंग आमले, दिपक कार्ले, जगन्नाथ गायकवाड यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदम शेख, स्वाती अहिरे यांनी केले. आभार रंगनाथ सुंबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा पडवळ, कल्पना ठुबे, भाग्यश्री वेताळ, पुष्पवर्षा भिंगारे, आशंका मुळे, भिमाजी शिंदे, मंजुषा दरेकर, अनिल पंडित, सागर देवकर, महेश मुळे यांनी परिश्रम घेतले.