• Wed. Dec 11th, 2024

शेतकर्‍यांच्या बांधावर वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ByMirror

Jun 8, 2022

वेळीच निसर्गाचा समतोल न राखला गेल्यास विनाश अटळ -डॉ. संतोष गिर्‍हे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवार, डोंगर रांगा, उजाड माळरान हिरावाईने फुलल्यास पर्यावरण संवर्धनाचा उद्देश सफल होणार आहे. यासाठी वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन होण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडून त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. वेळीच निसर्गाचा समतोल न राखला गेल्यास विनाश अटळ असल्याचे प्रतिपादन उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे यांनी केले.


उमंग फाऊंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण व संवर्धन सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहातंर्गत टोकेवाडी (ता. नगर) शिवारात शेतकर्‍यांच्या बांधावर वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तर या अभियानात शेतकर्‍यांना सहभागी करुन घेत त्यांना वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्यास प्रवृत्त करण्यात आले. यावेळी माधव कराळे, गंगाधर कराळे, वैशाली अडकर आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना डॉ. गिर्‍हे यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेल्या पाऊलाने सजीव सृष्टी सुरक्षित राहणार आहे. कोरोनाने पर्यावरणासह ऑक्सिजनचे महत्त्व जगा समोर आनले. मनुष्याने काळाची गरज ओळखून या वृक्षरोपण मोहिमेत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी शेतकर्‍यांना बांधावर लावण्यासाठी विविध फळझांडांचे वाटपही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *