राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय येथे निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)-समाज कल्याण विभागाकडून लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात निवेदन देताना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, पप्पू पाटील, समीर भिंगारदिवे, संजय दिवटे, विकी तिवारी, सतीश साळवे आदी उपस्थित होते.
उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना ओरिजनल दाखला मागितला जातोय १२वीचा मुल दाखला महा डीबीटी पोर्टल वर तसा मूळ दाखल सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचा त्यांना अपात्र ठरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे राज्य शासनाच्या 1 नोव्हेंबर 2003 मध्ये अटी व शर्ती बाबत ध्ये शाळा सोडल्याचा दाखला मूळ टीसी घेणे. डूपलिकेट टीसी असल्यास दोन ठिकाणी प्रवेश नसल्याची खात्री करणे व टीसी का सादर नाही. याबाबत शपथपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र अहमदनगर जिल्हा समाज कल्याण विभागाने 12वीच्या मूळ दाखल्याच्या नावाखाली शिष्यवृत्ती नाकारून या योजनेला हरताळ फासला आहेत या प्रकरणी अधिकाऱ्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून चौकशी करून जी प्रकरणे नामंजूर आहेत या सर्व प्रकरणाची फेर छाननी करून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून द्यावा व कोणताही विद्यार्थी अपात्र राहणार नाही याची दक्षता घ्यावी या मागणीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येत्या 8 दिवसात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.