अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत जिल्हास्तरीय वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीवर अशासकीय सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील वेठबिगार पध्दती अधिनियम 1976 मधील तरतुदीनुसार काम केले जाणार असून, वेठबिगार निर्मूलनासाठी समिती जिल्ह्यात सक्रीय राहणार आहे.
भैय्या बॉक्सर यांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व कला क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांची वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली असून, या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.