आमदार अरुणकाका जगताप यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार
गुरु शिष्याला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतो -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुपौर्णिमा गुरुपूजनाने उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार अरुणकाका जगताप यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी सत्कार केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, उद्योग व्यापार सेलचे शहराध्यक्ष अनंत गारदे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, गणेश बोरुडे, मयुर भापकर, ऋषी ताठे, राजेंद्र ससे, संतोष ढाकणे, मोहन गुंजाळ, बाली बांगरे, राजेंद्र ससे, गुड्डू खताळ, संजय सत्रे, राजेश भंडारी, राजू शेटीया, माऊली जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, गुरु शिष्याला ज्ञानाने प्रकाशमान करुन, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवत असतो. गुरुशिवाय जीवन अंधकारमय आहे. आमदार अरुणकाका जगताप यांनी गुरुस्थानी राहून अनेक कार्यकर्त्यांना घडविले. कार्यकर्त्यांना फक्त राजकारणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना जीव लावून जगण्याची दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक कार्यकर्ते जीवनात यशस्वी झाले असून, विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व गाजवत आहे. गुरुंच्या मार्गदर्शनानेच मनुष्याचे जीवन सुखी होणार असून, गुरुप्रती कृतज्ञता म्हणून गुरु पूजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.