पठाण यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सेक्स रॅकेट चालविणार्या शहरातील त्या दांम्पत्याची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन फिरोज पठाण यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. तर सदर दांम्पत्याच्या मोबाईलची सीडीआर चौकशी केल्यास शहरासह जिल्ह्यात चालणाराअवैध देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
पठाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शहरातील हे दांपत्य जिल्ह्यामध्ये महिलांचे देह विक्रीचे मोठे रॅकेट चालवत आहे. त्यांच्याशी झालेल्या काही व्यवहार व संबंधामुळे त्याबाबत मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून महिलांना बळजबरीने आणून त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करुन घेतला जात आहे. यामध्ये कित्येक मुली अल्पवयीन असतात, त्यांना शारीरिक त्रास देऊन देहविक्री करण्यास भाग पाडले जात आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.