मिशन झिरो ड्रॉप आऊट अभियान
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेच्या शिक्षकांनी केले सर्व्हेक्षण
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या मिशन झिरो ड्रॉप आऊट अभियानातंर्गत शहरात शालेय शिक्षकांचे सर्व्हेक्षण सुरु असून, शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचा शोध घेतला जात आहे. रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी माळीवाडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहतीमध्ये जावून सर्व्हेक्षण केले.
प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके व माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी घरोघरी जावून पालक व विद्यार्थ्यांची माहिती घेतली. या अभियानात शालेय शिक्षक मिनाक्षी खोदडे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, राहुल शिंदे, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली वेताळ, इंदुमती दरेकर, अर्चना जाधव, स्वप्नील मकासरे आदी सहभागी झाले होते.
शिक्षण विभागाच्या वतीने शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 5 ते 20 जुलै या कालावधीत मिशन झिरो ड्रॉप आऊट हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी सर्वच शालेय शिक्षक घरोघरी जावून सर्वेक्षण सुरु आहे.