एमएससीडीए पॅनलच्या पदाधिकारी व उमेदवारांची शहरातील फार्मसी कॉलेजला भेटी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमएससीडीए पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्य केमिस्ट संघटनेचे जनसंपर्क अधिकारी अजित पारख , माजी कौन्सिल सदस्य प्रमोद सोलंकी,व राज्य फार्मसी कौन्सिलचे उमेदवार अतुल अहिरे यांनी शहराचा दौरा करुन फार्मसी कॉजेला भेटी दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन कर्डिले, सचिव राजेंद्र बलदोटा, जिल्हा संचालक संजय गुगळे, शहराध्यक्ष दत्ता गाडळकर, खजिनदार महेश रच्चा , विशाल शेटिया, मनोज खेडकर, अविनाश साळुंके, , ज्ञानेश्वर यादव, योगेश कदम, हिरालाल पाटील, आशुतोष कुकडवाल, अविनाश साळुंखे आदी उपस्थित होते.
अहमदनगर शहर व तालुक्यातील काकासाहेब म्हस्के कॉलेज ऑफ फार्मसी, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, एन.जे. पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी, एन.एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी, एन.डी. कासार कॉलेज ऑफ फार्मसी आदी महाविद्यालयांना भेटी देऊन प्राचार्य, प्राध्यापक व फार्मासिस्ट यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी एमएससीडीए चे सर्व उमेदवारांना मतदान करुन निवडून देण्याचे आवाहन उमेदवार अतुल अहिरे यांनी केले.
शहराध्यक्ष दत्ता गाडळकर म्हणाले की, फार्मसी बंधू भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी व न्याय हक्कासाठी अखिल भारतीय औषधे विक्री संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे व सचिव अनिल नावंदर योगदान देत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमएससीडीए पॅनलची उभारणी करण्यात आली असून, यामध्ये सर्व उच्चशिक्षित आणि फार्मासिस्टच्या न्याय हक्कासाठी तळमळीने कार्य करणारे उमेदवार देण्यात आले आहे. या सर्वांना निवडून देण्याचे त्यांनी सांगितले. या दौर्याचे नियोजन महेश रच्चा यांनी केले होते. आभार संजय गुगळे यांनी मानले.