• Wed. Dec 11th, 2024

शहरात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन

ByMirror

Aug 8, 2022

तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेला तीनशे खेळाडूंचा सहभाग

खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो. खेळाने अपयश पचविण्याचे व विजयानंतर पुढील ध्येय गाठण्याचे गुण विकसीत होत असतात. मुलांना घडविण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी त्यांना मैदानी खेळाकडे पालकांनी घेऊन गेले पाहिजे. पालकांसह मुले देखील मोबाईलमध्ये गुंतल्याने मुलांचे खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रतिपादन तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.


तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन सावेडी येथील भगवान बाबा चौक गंगा लॉन्स येथे पार पडले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. विधाते बोलत होते. याप्रसंगी असोसिएशनचे सचिव घनश्याम सानप, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, अ‍ॅड. शिवाजी सांगळे, दिनेश गवळी, आशिष ताकटे, अनिल आढाव, नारायण माळी, नारायण कराळे, अल्ताफ खान, गणेश वंजारी, महेश वाघ, दीपक धनवटे, मयूर टेमक, स्वप्निल काळे, मंदा खंदारे, सचिन कोतकर, महादेव सर आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे प्रा. विधाते यांनी जीवनामध्ये स्पर्धा नसेल, तर जीवन नीरस होते. खेळाच्या माध्यमातून खेळाडूंना शिस्त व चांगल्या सवयी लागतात. खेळाने शारीरिक व बौध्दिक विकास साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात घनश्याम सानप यांनी कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून ज्युदोच्या मोठ्या स्पर्धा झाल्या नाहीत. यावर्षी खेळाडूंसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंचा विकास साधण्यासाठी असोसिएशन प्रयत्नशील असून, या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन व इंडिया तायक्वांदो यांच्या मान्यतेने घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


या स्पर्धेला जिल्ह्यातून तीनशे खेळाडूंचा सहभाग लाभला. विविध गटात रंगतदार सामने रंगले होते. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची औरंगाबाद येथे होणार्‍या राज्य स्पर्धेसाठी निवड होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *