अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्यासह राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजय वाकचौरे, विभागीय जिल्हा प्रमुख भिमराज बागुल, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता, त्यांचा शहरातील पत्रकार चौकात रिपाई युवक आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, अशोक गायकवाड, महिला नेत्या जयाताई गायकवाड, प्रदेश उपाध्यक्षा प्रविणाताई घैसास, दया गजभिये, आकाश बडेकर, निखिल सुर्यवंशी, विलास साळवे, गौतम कांबळे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, वसंत भिंगारदिवे, अजय पाखरे, सनी माघाडे, योगेश दौंडे, संदीप भिंगारदिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी जिल्ह्यात युवक आघाडीच्या वतीने सुरु असलेल्या कार्याचा अहवाल ना. आठवले यांच्याकडे मांडला. तर पक्षात युवकांची शक्ती वाढविण्यासाठी रिपाईच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने युवक रिपाईला जोडले जात असून, गाव तेथे शाखा अभियानाद्वारे पक्षाचे कार्य सुरु असल्याचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी स्पष्ट केले.