मोरया युवा प्रतिष्ठानची शिवजयंती सामाजिक उपक्रमाने साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आला. आमदार संग्राम जगताप व घर घर लंगर सेवेचे जनक आहुजा यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन मदान, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब पवार, अक्षय कर्डिले, नगरसेविका ज्योती गाडे, अमोल गाडे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, राकेश गुप्ता, प्रदीप पंजाबी, राहुल बजाज, संतोष ढाकणे, ललित पोटे, राकेश गुप्ता, अभिलाषा मदान, अर्चना मदान, अर्पणा मदान, अनिता गुप्ता, राजेंद्र कंत्रोड, अनिश आहुजा, राजा नारंग, सागर सारडा, अभिनव अंबाडे, पवन वर्मा आदींसह घर घर लंगर सेवेचे सेवादार उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या वतीने मागील आठ वर्षापासून सामाजिक उपक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात येते. यावर्षी पाचशे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात या भागातील दुर्वा महिला बचत गटाच्या गायत्री जोशी, वर्षा घुले, योगिनी आडकर, सुमन बांगर, दिपाली, रेखा जोशी, शारदा होशिंग आदी महिलांनी देखील सहभाग नोंदवला होता.
अर्जुन मदान म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेवर आधारित लोककल्याणकारी राज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन करुन आधुनिक लोकशाहीचा पाया रचला. मानवी मुल्यांचा आदर्श त्यांनी जगासमोर आनला. त्यांचा आदर्श समाजाच्या विकासासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनी मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.