सामाजिक भावनेने प्रत्येकाने योगदान दिल्यास अनेक प्रश्न सुटणार -ज्योती गडकरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाच्या वतीने शहरातील आरटीओ ऑफिस व स्टेट बँक चौक येथील फुटपाथवर वास्तव्यास असलेल्या दुर्बल घटकातील कुटुंबीयांना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे प्रमुख अॅड.शिवजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर वायफट खर्चांना फाटा देऊन हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तुकाराम विघ्ने, पोलीस नाईक शैलेश गोंसाळे, संपदा तांबे, सलिम शेख, मच्छिंद्र गाली, बाबासाहेब पातकळ, भीमा कुल्लाळ आदी उपस्थित होते.
ज्योती गडकरी यांनी सामाजिक भावनेने प्रत्येकाने योगदान दिल्यास अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. युवकांनी अशा सामाजिक उपक्रमाचे अनुकरण करण्याचे त्यांनी आवाहन केले. अॅड. शिवाजीराव काकडे यांनी वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याच्या आवहानाला प्रतिसाद देऊन शहरात हा उपक्रम राबविण्यात आला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या फुटपाथवरील कुटुंबीयांना या उपक्रमाने आधार मिळाला आहे.