अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची उपस्थिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी (दि.16 एप्रिल) टिळक रोड येथील हॉटेल राज पॅलेस मध्ये केमिस्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष चेतनकुमार कर्डिले व सचिव राजेंद्र बलदोटा यांनी दिली.
या मेळाव्यामध्ये औषधी व्यवसाय व त्यासमोरील आव्हाने, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या निवडणुकीसंबंधी त्याचप्रमाणे ऑनलाईन मेडपलस, वन एमजी, वेलनेस शॉपी सारख्या येणार्या संकटावर कशी मात करावयाची याबाबत जगन्नाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे जनसंपर्क अधिकारी अजित पारख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासनगर शहर व तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष दत्ता गाडळकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय गुगळे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन शहर सचिव विलास शिंदे, खजिनदार महेश रच्चा, नितीन गांधी व सर्व संचालकांनी केले आहे.