• Wed. Dec 11th, 2024

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांचा शिक्षक दिनी होणार सन्मान

ByMirror

Aug 28, 2022

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ

2 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.


स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्य सुरु आहे. विविध क्षेत्रात शिक्षक रात्रंदिवस कष्ट करुन समाज घडविण्याचे कार्य करतात. मात्र त्यांचे कार्य प्रकाशझोतात येत नाही. त्यांचे कार्य समाजापुढे आनण्यासाठी व त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा सन्मान केला जाणार असल्याचे डोंगरे यांनी म्हंटले आहे.


5 सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी शिक्षकांनी आपल्या कार्याची माहिती असलेला प्रस्ताव 2 सप्टेंबर पर्यंत पै. नाना डोंगरे (अध्यक्ष, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था) ता. जि. अहमदनगर 414005 महाराष्ट्र या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *