अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै.दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयातील दहावी बोर्डाच्या बोर्डाच्या परीक्षा उपकेंद्रावर परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प वाटून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस प्रा.शिवाजीराव विधाते, अभेद्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर विधाते, मुख्याध्यापिका शोभा गाडगे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, सारिका गायकवाड, संतोष सुसे, अमोल मेहेत्रे, भाऊसाहेब पुंड, योगेश दरवडे, राधाकिसन क्षीरसागर, शोभा गीते, लता म्हस्के, सविता सोनवणे, निता जावळे आदी उपस्थित होते.
प्रा.शिवाजीराव विधाते म्हणाले की, कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण झाले. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जात आहे. त्यांच्या मनात एक भिती व दडपण असून, त्यांना धीर देण्यासाठी या शुभेच्छा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहावी बोर्डाची परिक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व तणावमुक्त पध्तीने पेपर जाण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.