हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशन, बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊस व सहा. आयुक्त समाज कल्याण विभाग आयोजित
उन्हाळी शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी उन्हाळी शिबीराची आवश्यकता आहे. मोबाईल मध्ये भावीपिढी अडकत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळण्याची गरज आहे. मागील दोन वर्ष विद्यार्थी कोरोनामुळे घरीच होती. त्यामुळे त्यांना मैदानी खेळ व इतर विविध कलागुणांपासून अलिप्त रहावे लागले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले.
हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशन, बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊस व सहा. आयुक्त समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित घेण्यात आलेल्या उन्हाळी शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवढे बोलत होते. यावेळी न्यू आर्टस कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, डॉ.अनिल आठरे, सिनेट सदस्य शिवाजी साबळे, बाबासाहेब देवहाडे, किरण बोरुडे, जगन्नाथ सावळे आदी उपस्थित होते.
न्यु आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात तीन दिवसीय उन्हाळी शिबीर पार पडले. या शिबीरास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये विद्यार्थ्यांना मॉडलिंग, अॅक्टिंग, डान्स, योगा, झुंम्बा, फोटोग्राफी, मेकअप आदी प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत लेखक-निर्माते भैय्या बॉक्सर, मेकअप आर्टिस्ट सना शेख, सिने कलाकार प्रदीप वाळके, योगगुरू किरण बालवे, वृत्तछायाचित्रकार वाजिद शेख, नृत्यकलाकार रुपेश पासपुल यांनी मार्गदर्शन केले.
या उन्हाळी शिबीरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत पुर्वा परंडकर, स्वरा पांडे, गणेश बनकर, ओवी सोनमाळी, सायली सोनमाळी यांनी बक्षिसे पटकाविली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मनस्वी बळीद, श्रुती ओहोळ, प्रेरणा ओहोळ, आरती फुंदे यांनी परिश्रम घेतले.