गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची बुकिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे महामार्ग केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेच लॉच झालेली हॅचबॅक कूल न्यू टोयोटा ग्लान्झाचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. वासन ग्रुपचे चेअरमन विजय वासन व तरुण वासन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारच्या अनावरणाप्रसंगी वासन टोयोटाचे जनक आहुजा, अनिश आहुजा, दिपक जोशी, प्रविण जोशी, रविंद्र थोरात, योगेश ठुबे, अशोक चोभे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, भारताच्या बाजारपेठेत टोयोटाचे नव-नवीन कार उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. सर्वांना परवडणारी सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम व अद्यावत तंत्रज्ञानचा समावेश असलेली ग्लान्झा गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी सज्ज झाली आहे. वासन टोयोटा शोरुम मोठ्या शहराच्या धर्तीवर विक्री पश्चात ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचे काम करत असून, त्यांनी आपल्या सेवा दर्जा उंचावला असल्याचे त्यांनी सांगितले.
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर हॅचबॅक कूल न्यू टोयोटा ग्लान्झा खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरु असून, गाडी अनावरणाच्या पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांनी हे नवीन मॉडेल घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे. या गाडीचे पहिले ग्राहक प्रशांत सुधाकर वामन यांना आमदार जगताप यांच्या हस्ते नवीन ग्लान्झाचे वितरण करण्यात आले.
टोयोटाची भारतातील सर्वात परवडणारी ऑफर, कूल न्यू टोयोटा ग्लान्झा अतिरिक्त परवडणारे प्रकार, प्रगत वैशिष्ट्ये, डायनॅमिक लूक, स्पोर्टी डिझाइन आणि कमी देखभाल खर्चासह ग्राहकांसाठी पूर्णपणे सज्ज आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि टोयोटा सिग्नेचर फ्रंट फॅसिआचे छान एकत्रीकरण, केवळ टोयोटा अभियंत्यांद्वारे डिझाइन केलेले, कूल न्यू ग्लान्झा प्रगत कनेक्ट केलेले, टोयोटा आय-कनेक्ट वैशिष्ट्ये, सेवा आणि मूल्यवर्धित, एक स्टॉप सोल्यूशनसह उपलब्ध आहे. आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या जाणकार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसित केलेल्या सेवा यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी नवीन ग्लान्झाची इंजिन क्षमता 66 के. डब्ल्यू (89 पीएस) च्या पॉवर आउटपुटसह 1197 सीसी आहे. सध्याच्या लाइन-अपमध्ये दोन नवीन परवडणार्या ग्रेडसह उत्पादन सादर केले जाईल – ई (नवीन), एस (नवीन), जी आणि व्ही.टोयोटासाठी सुरक्षितता सर्वोपरि आहे, म्हणूनच कूल न्यू ग्लान्झा प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा सर्वात प्रभावी संच ठरली आहे.शिवाय, कूल न्यू ग्लान्झा तीन वर्षे/1 लाख किलोमीटरच्या वॉरंटीद्वारे आणि ग्राहकांचे समाधान वाढवण्यासाठी 5 वर्षे/2 लाख 20 हजार किलोमीटरपर्यंतच्या विस्तारित वॉरंटीद्वारे प्रख्यात टोयोटा अनुभवासह एकत्रित केले आहे. कूल न्यू ग्लान्झाचे बुकिंग 11 हजार रुपयात सुरु झालेले असून, गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर बुकिंगला सर्वोत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शोरुमचे अनिश आहुजा यांनी दिली. हे वाहन टेस्ट ड्राईव्हसाठी वासन टोयोटा शोरुम मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.