शोभायात्रेने वेधले सर्वांचे लक्ष
हिंगे परिवाराने घडविला धर्मकार्य, देशभक्ती, शैक्षणिक मदतीचा त्रिवेणी संगम
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वाळुंज (ता. नगर) येथे श्री राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. गावातून बॅण्ड पथक, भजनी मंडळासह निघालेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले. भक्तीगीत, गवळण व किर्तनाने वातावरण भक्तीमय बनले होते.
शोभायात्रेनंतर श्री राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार्या मंदिरात वेदशास्त्र संपन्न अनिल देवावाळुंजकर महाराज आणि सहकारी ब्रम्हवृंदाने होमहवन, पुजा केली. संत पूजन आणि संताची मिरवणूक होऊन ह.भ.प बालयोगी अमोल महाराज जाधव यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मंत्रोच्चारात करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याचे संपूर्ण यजमानपद स्विकारून मूर्तीसह, धार्मिक पुजा, महाप्रसाद आदीसाठी दोन लाख रुपयापेक्षा अधिक आर्थिक योगदान स्वामी विवेकानंद ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष गोरखनाथ राजाराम हिंगे व माजी सरपंच पार्वतीताई गोरखनाथ हिंगे यांनी दिले. या सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, सविता हिंगे, मनीषा कोतकर, मकरंद हिगे, मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहकले यांचे विशेष योगदान लाभले.
सामुदायिक राष्ट्रगीतनंतर रामायणाचार्य ह.भ.प. नंदकिशोर खरात महाराज यांचे काल्याचे किर्तनानंतर सर्व भाविकांसह ज्ञानदीप विद्यालय, प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले. गोरखनाथ हिंगे यांनी ज्ञानदीप विद्यालय विद्यार्थी कल्याण निधीसाठी 5 हजार रुपयांची मदत दिली. एकाच वेळी धर्मकार्य, देशभक्ती, शैक्षणिक मदतीचा त्रिवेणी संगम हिंगे परिवाराने घडविला.
कार्यक्रमासाठी युवा नेते अक्षय कर्डिले, अभिलाष घिगे पाटील, दादासाहेब दरेकर, हरिभाऊ कर्डिले, रेवणन्नाथ चोभे, प्रशांत गायकवाड, बाळासाहेब हराळ, बाजीराव मुंगसे पाटील, दिलीपराव मोटे, दत्तात्रय कार्लेसर, आप्पासाहेब कोतकर, ह.भ.प. नवले महाराज, कडूभाऊकाटे महाराज, अमोल सातपुते महाराज, सचिन पवार, योगेश शेजूळ, रविंद्र आव्हाड, आसाराम सातपुते, गोविंद महाराज महादेव, भाऊ शेळमकर, बाळासाहेब दरेकर, संतोष म्हस्के, मच्छींद्रनाथ हिंगे, प्रा. जगन्नाथ हिंगे, सरपंच विजय शेळमकर, वाळुंज ग्रामपंचायतचे सर्व आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन, संचालक, श्री. स्वामी विवेकानंद संस्थेचे संचालक मंडळ, वाळुंज ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.