आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची गरज -पोपटलाल भंडारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस घारगाव (ता.श्रीगोंदा) येथील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले वसतीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व खाऊचे वाटप करुन साजरा केला. यावेळी पोपटलाल भंडारी, नीलेश भंडारी, वसतीगृहाचे खामकर सर, फुलकवर भंडारी, मंजुषा भंडारी, मधु भंडारी, दीपिका भंडारी, रचना भंडारी, तनिष्क भंडारी, काव्या भंडारी, आरूष भंडारी, रूही भंडारी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
तनिष्क भंडारी याचा वाढदिवस निमित्त इतर वायफट खर्चांना फाटा देत भंडारी परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कोरोनानंतर शाळा सुरु झाल्या असून, लवकरच परीक्षेचे वेध लागले आहेत. मात्र सर्वसामान्यांची घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, घारगाव येथे वसतीगृहात राहून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा परिस्थिती गंभीर आहे. त्यांना आधार देण्याच्या भावनेने हा उपक्रम घेण्यात आला.
पोपटलाल भंडारी म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, त्यांच्या माध्यमातून समाजाची जडण-घडण होणार आहे. लहान वयात विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार झाल्यास त्यांचे उद्याचे भवितव्य उज्वल असणार आहे. सामाजिक देणे या भावनेने दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची गरज आहे त्यांनी वसतीगृहासाठी दर महिन्याला एक तेलचा डबा देण्याचे जाहीर केले व खामकर वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले .
यावेळी खामकर सर यांनी भंडारी कुटुंबाचे तसेच एल अॅण्ड टी कंपनीचे अरविंद पारगावकर व स्व. शांतिकुमार फिरोदिया फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया यांनी वसतीगृह व शाळेची इमारत उभारणीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती देऊन त्यांचे विशेष आभार मानले. तनिष्क भंडारी यांनी महिन्यातून एक दिवस आपल्या मित्रांसह विविध खेळाचे साहित्य घेऊन वसतीगृहातील मुलांसह घालवणार असल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.