• Thu. Dec 12th, 2024

वर्ष श्राध्द कार्यक्रमात नागरिकांना आम्रवृक्षाचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ByMirror

Jun 18, 2022

मानवसृष्टीला ऑक्सीजनरुपी जीवन वृक्ष देतात -ह.भ.प. संजय महाराज महापुरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड राऊत मळा येथे सिंधू भिमराज रासकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन त्यांचे बंधू व मुलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन आलेले पाहुणे व नागरिकांना आम्रवृक्ष व ज्ञानेश्‍वरीचे वाटप केले.
सिंधू रासकर यांचा नुकताच प्रथम वर्ष श्राध्दचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे तसेच मुलगा मुलगा किरण भिमराज रासकर, मुलगी सुनिता बाबासाहेब बनकर व स्वाती विजय विधाटे यांनी हा आगळावेगळा समाजोपयोगी उपक्रम राबविला.


ह.भ.प. संजय महाराज महापुरे यांनी आपल्या प्रवचनात पर्यावरणावर मनुष्याचे जीवन अवलंबून आहे. पर्यावरणाचे समतोल राखण्याचे कार्य वृक्ष करतात. मानवसृष्टीला ऑक्सीजनरुपी जीवन वृक्ष देत असतात. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले. यासाठी वृक्षरोपण कर्तव्य म्हणून करणे काळाची गरज बनली असून, जीवनात एकतरी झाड लावून ते वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.


सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी जीवन चक्रानुसार मरण अटळ आहे. पण घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षरोपण केल्यास पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार असल्याचे सांगितले. यावेळी महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी बनकर, उद्योजक रमेश भोजने, राजू लेंडकर, बबनराव बनकर, शोभा राऊत, रुक्मिणी भोजने, राहुल भोजने, बाबू रासकर, वैभव राऊत, सचिन रासकर, मनोज रासकर, वीर हनुमान दिंडी सोहळ्याचे गणपतराव सांगळे, झुंबर आव्हाड, रामदास कानडे, बाबासाहेब बनकार, विजय विधाटे, गाडळकर आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाचे शहरात स्वागत व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *