विवो कंपनी व उर्मी सामाजिक संस्थेचे उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- विवो कंपनी व उर्मी सामाजिक संस्थेच्या वतीने भिंगार येथील वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शैक्षणिक व शालेय उपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, उद्योजक कमलेश झंवर (भिंगारवाला), जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, माजी नगरसेवक संजय चोपडा, अजित जगताप, विवो कंपनीचे एचआर मॅनेजर जयदिप मोहिते, सुरेश कदम, मनोज कुमार, प्रमोद वाघ, कमलेश वर्मा, तेजस डेव्हिड, शिवकांत चव्हाण, वडारवाडी गावचे सरपंच आरती तागडकर, शाळेचे मुख्याध्यापिका विजया वराडे, उपशिक्षिका ज्योती नेटके, संगीता आडेप, सावित्री पाटील, रामकिसन वागस्कर आदीसह विवो कंपनीचे मान्यवर उपस्थित होते.
विवो कंपनीचे एचआर मॅनेजर जयदिप मोहिते म्हणाले की, विवो कंपनी व उर्मी सामाजिक संस्थेच्या वतीने मुलांच्या उपयोगासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले असून, वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 5 ग्रीन बोर्ड, 5 फॅन, वॉटर फिल्टर मशीन तसेच बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्यासाठी ई लर्निंग सिस्टीम भेट देऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. येणाऱ्या सहा महिन्यानंतर देखील कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती बघून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आमदार संग्राम जगताप यांनी विवो कंपनी व उर्मी सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका विजया वराडे यांनी केले. आभार उद्योजक कमलेश झंवर (भिंगारवाला) यांनी मानले.