वडगाव गुप्ताला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहण्यासाठी मातंग समाजबांधव प्रयत्नशील -नामदेव चांदणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत वडगाव गुप्ता येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे राहण्यासाठी मातंग समाजबांधव प्रयत्नशील आहे. समाजाच्या विकासासाठी सर्व पक्षात कार्य करणार्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. चमकोगिरी करणार्या समाजातील स्वयंघोषित नेते फक्त जाहिरातबाजी करुन समाजाचे नेते असल्याचा बनाव करत असून, समाजाची फसवणुक व बनवाबनवी करणार्यांना समाजाने उघडे पाडण्याचे आवाहन सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष नामदेव चांदणे यांनी केले.
वडगाव गुप्ता (ता. नगर) येथे मातंग समाजाचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी नामदेव चांदणे बोलत होते. शोभाताई चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यासाठी भगवान जगताप, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष नामदेव चांदणे, काशिनाथ सुळाखे पाटील, प्रकाश तुजारे, सुनील सकट, संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, दिलीप सोळसे, विश्वनाथ अल्हाट, ना.म. साठे, सचिन साठे, पोपट साठे, बापूसाहेब गायकवाड, संजय त्रिभूवन, अॅड. नितीन पोळ, अॅड. लक्ष्मण बोरुडे, सागर साळवे, कैलास साळवे, सचिन नवघिरे, श्रीराम दाखले, मनोज डाडर, रंगनाथ वैदंडे, सतीश बोरुडे, नंदकुमार ससाणे, राकेश जगधने, सागर गायकवाड, प्रमोद वाघमारे, विजय पाथरे, भगवान गोरखे, सुरेश चांदणे, जीवन चांदणे, निलेश चांदणे, भैय्या चांदणे, संतोष नेटके, रशिद शेख, किशोर वाघमारे, सुनिल भोसले, किरण उमाप, विकास उडाणशिवे, राजू पवार, अडागळे, राज साळवे, रिंकू चांदणे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात भगवान जगताप यांनी वडगाव गुप्ता ग्रामपंचायत हद्दीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाची गट क्रमांक 595/1 मधील 300 एकर पैकी 10 एकर जागा मागण्यात आली आहे. सन 2017 पासून जागेसाठी पाठपुरावा सुरु असून, या नियोजित स्मारकाच्या जागेत हा मेळावा घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्यात समाजातील ज्येष्ठ नेते व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे व पार्वती चांदणे यांचा सामाजिक योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
या मेळाव्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे राहण्यासाठी शासनाकडून जागा घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तर जागेसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी समाजबांधवांनी दिला. तसेच समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मेळाव्यास लहूजी शक्ती सेनेचे राज्य प्रमुख विष्णूभाऊ कसबे यांनी भेट देऊन स्मारकासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बन्सीभाऊ वाघमारे यांनी आभार मानले.