पोतराजांनी वेधले लक्ष
अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील लालटाकी येथे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पोतराज, भक्तगण व डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्री क्षेत्र वरखेडच्या महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लालटाकी येथील महालक्ष्मी मंदिरात पूजारी साहेबराव काते व सुशीलाबाई काते यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. होम-हवन होऊन महालक्ष्मी देवीची आरती करण्यात आली. कोरोना महामारी नष्ट होण्यासाठी मागील वर्षी महालक्ष्मीचरणी साकडे घालण्यात आले होते. त्याची नवसपुर्ती या यात्रेत करण्यात आली.
चैत्र महिन्यात श्री क्षेत्र वरखेडच्या महालक्ष्मी देवीची यात्रा उत्सव साजरा होताना संपुर्ण महाराष्ट्रात देवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी भाविक आपल्या पध्दतीने उत्सव साजरा करत असतात. या पार्श्वभूमीवर साहेबराव काते यांच्या अध्यक्षतेखाली हा यात्रा उत्सव पार पडला. पारंपारिक वाद्यांचे गजर व लक्ष्मीमातेच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला होता. पोतराजचे नृत्य पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काते परिवाराच्या वतीने भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. याचा भाविकांसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी गणेश घोरपडे, दत्तात्रय जाधव, बहिरनाथ वैरागर, रेखा भोगले, अनिता जाधव, येनूबाई घोरपडे, मैना लोखंडे, सिताबाई रोकडे, गुनाबाई भोसले, आशाबाई मोहिते, उषा नाडे, ऋतिक क्षीरसागर, राम लोखंडे, पोतराज लखन लोखंडे, ऋषी वैराळ, अनिल नेटके, नितीन कनगरे आदींसह लालटाकी भारस्कर कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.