अहमदनगर (प्रतिनिधी)- भूतकरवाडी येथील लक्ष्मीबाई सर्जेराव सुपेकर (वय 95 वर्षे) यांचे गुरुवारी (दि.17 फेब्रुवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले रविंद्र व राजेंद्र सुपेकर यांच्या त्या आई होत्या.