सावली संस्था, अनामप्रेम, युवान संस्थेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर होत असताना, काळाची गरज ओळखून गरजू घटकातील युवक-युवतींना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीच्या वतीने वेब डिझाईनचे तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला सावली संस्था, अनामप्रेम, युवान संस्था व के.जी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
रोटरी इंटेग्रिटीच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त सुरु असलेल्या सामाजिक उपक्रमातंर्गत मार्केटयार्ड येथील द टेक हब येथे रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्डस (रायला) यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या वेब डिझाईनच्या प्रशिक्षणात परदेशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमद्वारे शिकवणारे मुंबई येथील प्रोफेसर नम्रता मालू यांनी युवक-युवतींना वेबसाइट डिझाईन करण्यापासून वेब पेज बनविण्याचे शिकवले. प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवक-युवतींना रोटरी इंटेग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, प्रकल्प प्रमुख पुनीत वोहरा, राजेश परदेशी, टेक हबचे श्री किरण गुंड यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.