लोकशाहीला अभिप्रेत भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा झालेल्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे किसनराव लोटके, अंबादास गारुडकर, फारुक रंगरेज, शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, माजी नगरसेवक गौतम भांबळ, संभाजी पवार, संजय चोपडा, सरचिटणीस अॅड. मंगेश सोले, उपाध्यक्ष अमोल कांडेकर, कुमार नवले, अजय दिघे, माऊली जाधव, सोनू घेबूड, किसन बेदमुथा, गणेश बोरुडे, उमेश धोंडे, विशाल बेलपवार, लहू कराळे, शिवम भंडारी, विनोद साळवे, रेणुका पुंड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून, यामागे अनेकांचा त्याग व बलिदान आहे. त्यांच्या उपकाराची परतफेड करता येणारी नसून, प्रत्येक भारतीयांनी कृतज्ञ राहून देशप्रेम व राष्ट्राभिमान बाळगला पाहिजे. संविधानाने देशात समता, स्वातंत्र्य व बंधुत्व टिकून असून, लोकशाहीला अभिप्रेत भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.