देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्मे झाले. त्यांना नमन करुन महाराष्ट्र दिन साजरा होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे विधाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमोल कांडेकर, अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष अब्दुल रऊफ खोकर, गणेश बोरुडे, निलेश इंगळे, संभाजी पवार, मारुती पवार, लहू कराळे, वैभव म्हस्के, रवी कुकडेकर, अर्जुन चव्हाण, प्रशांत कर्डिले आदी उपस्थित होते.
पुढे प्रा. विधाते म्हणाले की, महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी कामगार दिनही साजरा केला जातो. केंद्र सरकारने कोड बिल आणून मोठ्या संघर्षाने मिळवलेल्या कामगारांनी मिळवलेल्या कायद्यावर निर्बंध आले आहे. भांडवलदारांच्या हिताचा विचार करुन कामगार कायद्यात बदल करण्यात आले असल्याचे स्पष्ट करुन, श्रमिक कामगारांच्या भवितव्यासाठी राष्ट्रवादी योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.