अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील राधिका कुकडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य शाखेची पीएच. डी. पदवी जाहीर केली आहे. त्यांनी पुणे विद्यापिठाला ए स्टडी ऑफ मार्केटिंग प्रॉब्लेम फेस बाय स्मॉल स्केल इंडस्ट्री विथ स्पेशल रेफरन्स टू अहमदनगर डिस्ट्रिक्ट या विषयावरील प्रबंध सादर केला होता. यामध्ये त्यांनी अहमदनगर मधील लघू उद्योजकांचे मार्केटिंग विषयावर अभ्यास करुन त्यांचे प्रश्न आणि शासनाकडून मिळणारी मदत याबाबत सविस्तर अभ्यासपुर्ण मत मांडले आहे.
कुकडे यांना पीएचडीसाठी रिसर्च गाईड म्हणून डॉ. डी.वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट कॉलेजचे (पुणे) डायरेक्टर डॉ. एकनाथ खेडकर यांचे सहकार्य लाभले. तर डॉ. शरद कोलते, डॉ. रुचा तांदुळवाडकर, डॉ. सचिन घोलप, डॉ. संपत अय्यर यांचे मार्गदर्शन मिळाले. पीएच.डी. जाहीर झाल्याबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉ. आर.एम. चिटणीस, एचओएस स्मग डॉ. गौतम बापट, एचओडी स्मग प्रा. अमृता दिक्षीत, बीबीए विभागाचे सर्व सहकारी, जावेद शेख, स्वाती मुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कुकडे सध्या पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत कार्यरत आहेत.