जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने शहरातील रस्त्यांवर थांबून उपजिविका भागविणार्या कामगारांना ऊन व पावसाच्या संरक्षणासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे, सचिव डॉ. धनाजी बनसोडे यांनी शहरालगत रस्त्यावर बसलेल्या 35 कामगारांना मोफत छत्र्या दिल्या.
अंबिका बनसोडे यांनी हातावर पोट असलेले कष्टकरी बांधव रस्त्याच्या कडेला उघड्यावर विविध व्यवसाय करुन आपली उपजिविका भागवतात. त्यांचे ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनने हा सामाजिक उपक्रम राबविला. शेवटच्या घटकांना आधार देण्यासाठी फाऊंडेशन सामाजिक भावनेने योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. धनाजी बनसोडे म्हणाले की, जिजाऊ वेल्फेअर फाऊंडेशन सामाजिक भावनेने वंचितांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर कार्य करत आहे. अनेक गरजू घटक रस्त्याच्या कडेला डोक्यावर कुठलाही छत्र नसताना ऊन, पावसाची तमा न बाळगता पोटासाठी काम करत असतात. त्यांना आधार देण्यासाठी छत्र्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.