बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करणार मार्गदर्शन
राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात रविवारी (दि.3 जुलै) जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता होणार असून, यामध्ये बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष आणि महानायक, महानायिका संयुक्त जयंती निमित्त या प्रबोधन संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक जितेंद्र तोरणे व राजीव खांडेकर उपस्थित राहणार आहे.
या प्रबोधन संमेलनात या देशात ओबीसींची जाती आधारीत जनगणना का केली जात नाही?, शासक हे एक जातीचे षडयंत्र, मला शिकल्या-सवरल्या लोकांनी धोका दिला – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशभरात होत असलेल्या विविध विषयांवर या संमेलनात चर्चा होणार आहे. या चर्चा सत्रात जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष काजी-ए-शरियत हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद इर्शादुल्लाह, डॉ. मगन ससाणे, अॅड. राहुल मखरे, प्रा. गोरक्षनाथ वेताळ, श्रीकांत होव्हाळ, अर्शद शेख, नानासाहेब चव्हाण, सचिन बनसोडे, सुनिल जाधव, दिपक देवाळकर, अॅड. योहान मकासरे, संगिता शिंदे आदी सहभागी होणार आहेत.