अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी रविदास महाराजांनी विचार दिला -संजय खामकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टीकोन दिला. अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी विचार दिला व आदर्शवादी समाजाच्या निर्मितीसाठी योगदान दिले. संत रविदास महाराज यांचे विचार सर्व समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा रविदासीया धर्म संघटनेचे राज्याध्यक्ष संजय खामकर यांनी केले.
चर्मकार विकास संघाच्या वतीने संत रविदास महाराजांची 645 वी जयंती साजरी करण्यात आली. चर्मकार विकास संघाच्या सावेडी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी संत रविदासांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, अर्जुन कांबळे, संतोष कांबळे, विष्णू काजळकर, ज्ञानदेव पाखरे, अशोक नन्नवरे, भिकाजी वाघ, किसन बागडे, महेश काजळकर, अशोक नन्नवरे, नवनाथ पोटे, भोलेनाथ तेलोरे, सोमनाथ भगुरे, ज्ञानेश्वर कांबळे, गोपीनाथ म्हस्के, गणेश लव्हाळे, रुक्मिणी नन्नवरे, भाऊसाहेब आंबेडकर, अरविंद कांबळे, संभाजी साळे, सुभाष सोनवणे, अरुण गाडेकर, इंजि. तुकाराम गायकवाड, विलास जतकर, पाराजी साळे, भारत चिंधे, संतोष कानडे, निलेश आंबेडकर, अशोक आंबेडकर, विनोद कांबळे, किरण सोनवणे, मनोज गवांदे, दिलीप कांबळे, विनोद कांबळे, मनीष कांबळे, गणेश नन्नवरे, गोपीनाथ महाराज गाडे आदी उपस्थित होते.
पुढे खामकर म्हणाले की, संत रविदास महाराज यांचे विचार व लेखन साहित्य सर्व समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत आहे. या विज्ञानवादी विचाराने समाजातील अंधश्रद्धा व रुढी-परंपरा निर्मुलन होण्यासाठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.