नर्मदा परिक्रमा करणारे ते ठरले गावातील पहिले गृहस्थ
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुक्ती, सुख-शांती व समृध्दीसाठी नेप्ती (ता. नगर) येथील बाळासाहेब भानुदास मोरे यांनी खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा 101 दिवसात पुर्ण केली. 55 वर्षीय मोरे यांनी 4 हजार कि.मी. चा पायी प्रवास पुर्ण करुन नुकतेच गावात परतले असता, त्यांचा मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी स्वागत केले. नर्मदा परिक्रमा करणारे ते गावातील पहिलेच गृहस्थ ठरले आहे.
संपुर्ण समाज कोरोनाने भयभीत झाले असताना, अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेब मोरे यांनी नर्मदा परिक्रमाची सुरुवात ओंकारेश्वर पासून केली होती. या खडतर प्रवासात अनेक अडचणींचा सामना करीत ते गावात परतले. घरा समोर सडा-रांगोळी टाकून फटाक्याच्या आतषबाजीत ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. तर ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर व संरपच सुधाकर कदम यांनी त्यांचा परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल स्वागत करुन सत्कार केला. यावेळी बंटन कांडेकर, सतीश होळकर, पोलीस पाटील अरुण होले, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, उपसरपंच जालिंदर शिंदे, राजेंद्र होळकर, विजय कर्पे, मिठू मोरे, हौशिराम जपकर, अलका मोरे, सुनिता मोरे, सावित्री मोरे, मंजुळा मोरे, इंदूबाई मोरे, सविता मोरे, बाई कर्डिले, मंडाबाई जपकर, मनिषा जपकर, संध्या जपकर, कुमार होळकर, संभाजी जपकर, पोपट मोरे, सहादू कर्डिले, प्रमोद मोरे, प्रशांत मोरे, बंटी मोरे, सचिन मोरे, सागर मोरे, अर्जुन मोरे, अविनाश विधाते, हरी उरमुडे, योगेश वाघाडे, नितीन पवार, राजू पवार, सागर इंगोले, पितांबर जवणे, अवि होळकर, अक्षय कांडेकर, सिद्धांत जपकर, सुनिल चौरे, संतोष चौरे, नितीन चौरे, अथर्व थोरात आदी उपस्थित होते.
पायी नर्मदा परिक्रमा करणारे बाळासाहेब मोरे यांनी अनेकवेळा पायी वारी केलेली आहे. आयुर्वेदाचा अभ्यास असल्यामुळे ते गावातील लोकांना विनामुल्य आयुर्वेदिक सेवा देत असतात. त्यांची माळीवाडा येथे पूजा साहित्याचे दुकान असून, हे काम सध्या त्यांचा मुलगा प्रमोद मोरे पाहत आहे. त्यांची ही परिक्रमा नवसपुर्तीसाठी नसून, गावात सुख-शांती, आरोग्य व समृध्दीसाठी तसेच कोरोनामुक्तीसाठी होती. ही नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.