स्व. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान -आमदार संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलुलकर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अमित खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, सरचिटणीस गणेश बोरुडे, अभिजीत ढाकणे, बंटी खेतमाळीस, शशिकांत आठरे, गजेंद्र दांगट, मतीन ठाकरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. शेतकरी व सर्वसामान्यांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. त्यांचा वैचारिक वारसा आजही प्रेरणादायी व दिशादर्शक असून, हा वारसा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते खा. शरद पवार चालवित असून, महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासासाठी राष्ट्रवादी सदैव कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.