टिळक रोड यंग पार्टीचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील टिळक रोड यंग पार्टीचे वतीने मोहरमनिमित्त अनावश्यक खर्चांना फाटा देऊन यतिमखाना मधील विद्यार्थ्यांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडार्याचे वाटप करण्यात आले. यावेळी हजरत अन्वर कादरी, अबुल कासिम, मौलाना शेख अनिस, सुनील डिंमळे, राजेश तलरेजा, अभिमन्यू धर्मे, आसिफ शेख, साजिद शेख, फैरोज शेख आदी उपस्थित होते.
हजरत अन्वर कादरी म्हणाले की, मुहम्मद पैगंबर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून धर्मासाठी इमामे हसन-हुसेन यांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदानाची आठवण ठेऊन युवकांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.