राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तला असलेले पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी व मिरवणुकीतील स्वयंसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या वतीने एक हजार फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते फुड पॅकेटचे वाटप करुन करण्यात आली. यावेळी महापालिकेचे नगर सचिव तडवी, शोएब जहागीरदार, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शशिकांत नजान, सुशिल थोरात, सज्जाद जहागीरदार, अदनान जहागीरदार, मोहसीन कुरेशी, असीम शेख, साबिर शेख, दानिश शेख, सुलतान जहागीरदार आदी उपस्थित होते.
मोहरमच्या कत्तलच्या रात्रीपासून ते दुसर्या दिवशी रात्री विसर्जन मिरवणुकीत अहोरात्र पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी व मिरवणुकीतील स्वयंसेवक कार्यरत असतात. भूक-तहान विसरुन ते कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पोपहार वाटपाचा हा सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाने राबविला असल्याची माहिती साहेबान जहागीरदार यांनी दिली. तसेच मोहरमची मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी उत्सवकाळाची खरी गरज ओळखून राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.