गोविंद मोकाटेच्या अडचणीत वाढ
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठातही नुकताच फेटाळण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्याने मोकाटेचा जामीन औरंगाबाद खंडपिठात ठेवण्यात आला होता. ते देखील फेटाळण्यात आल्याने मोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जेऊर (ता. नगर) येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आलेले आहे. आरोपी मोकाटे फरार असून, त्याच्यावतीने उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन ठेवण्यात आला होता. महिलेवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा गंभीर असून, या प्रकरणाचा तपास अजून पुर्ण झालेला नाही. आरोपी मोकाटे राजकीय व्यक्ती असल्याने तपासात बाधा आणून ढवळाढवळ करु शकतो. या परिस्थितीमध्ये त्याला जामीन देणे योग्य नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व्ही.के. जाधव व संदीपकुमार मोरे यांनी 15 मार्च रोजी गोविंद मोकाटे यांचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावला. पिडीत महिलेच्या वतीने अॅड. व्ही.एच. दिघे यांनी यांनी बाजू मांडली.