• Thu. Dec 12th, 2024

मुलीला पळवून 36 दिवस ताब्यात ठेवणार्‍या आरोपीकडून पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या

ByMirror

May 24, 2022

पिडीत मुलीची पोलीस स्टेशनला फिर्याद


आरोपीला अटक करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणार्‍या मोकाट आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रकार सुरु असून, या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून, आरोपींना अटक न झाल्यास 16 जून रोजी पिडीत कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


पारनेर तालुक्यातील एका गावात 4 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीला शाळेतून जबरदस्तीने मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराने पळविले होते. 36 दिवस मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. सदर मुलीने प्रसंगावधान राखून पळ काढला व वडिलांना फोन करुन बोलावले. त्यानंतर पिडीत मुलीने आपल्या कुटुंबीयांसह 12 मे रोजी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये येऊन जबाब नोंदविला आहे. आज दहा दिवस उलटूनही या गुन्ह्यातील आरोपी पीडित कुटुंबीयांना गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत असून, पिडीत कुटुंबीय घाबरले आहे. त्यांच्यावर दबाव आनला जात असल्याने पीडित कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व पिडीत कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *