• Mon. Dec 9th, 2024

मुलीला पळवून नेणारा आरोपी व बेपत्ता अल्वयीन मुलीचा तपास लावण्यासाठी उपोषण

ByMirror

Jun 13, 2022

पोलीस वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर येथील मुलीला पळवून नेण्याच्या घटनेला महिना उलटून देखील आरोपी फरार असून, कोपरगाव येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने व सावरगाव (ता. पारनेर) येथे हागणदारीमुक्त व शौचालय अनुदान वाटपबाबत कारवाई होत नसल्याप्रकरणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात आले. या उपोषणात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे, एकनाथ रोकडे, सुरेश चिकणे, गौरव साळगट, मस्कु ठेवरे, रतण गिरी आदी उपस्थित होते.


पारनेर तालुक्यातील एका गावात 4 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीला शाळेतून जबरदस्तीने मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराने पळविले होते. 36 दिवस मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. सदर मुलीने प्रसंगावधान राखून पळ काढला व वडिलांना फोन करुन बोलावले. त्यानंतर पिडीत मुलीने आपल्या कुटुंबीयांसह 12 मे रोजी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये येऊन जबाब नोंदविला आहे. महिना होऊनही आरोपीला अटक करण्यात आली नसून, आरोपी पीडित कुटुंबीयांना गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत आहे. तसेच कोपरगाव शहरातून 2 जून पासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. याबाबत कोपरगाव पोलीस स्टेशनला मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने संशय असलेल्या आरोपींची नावे पोलिसांना दिली आहे. मात्र अद्यापि मुलीचा तपास लागलेला नाही. वारंवार हेलपाटे मारून देखील पोलीस वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


पारनेर तालुक्यातील मौजे सावरगाव गावठाण हद्दीत गट नंबर 1व 72 खाजगी मालकी असलेल्या क्षेत्रांमध्ये हागणदारी मुक्त करणे बाबत स्थानिक शेतकर्यांनी वेळोवेळी तक्रार करुन पाठपुरावा केलेला आहे. मात्र ग्रामपंचायत कार्यालयाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली आहे. सावरगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी अनुदान हडपण्यासाठी हागणदारीमुक्त योजनेत गाव बसवले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सावरगावात हागणदारीमुक्त योजनेची चौकशी करुन, ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या सर्व शौचालय अनुदान वाटप योजनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *