अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील मरहूम अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावलेली अल्फिया उमर पठाण (83 टक्के), द्वितीय आलेली मुस्कान मजिद सय्यद (82.20 टक्के) तृतीय क्रमांक मिळवलेली सानिया अल्ताफ शेख (81.20 टक्के) यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बोर्डाच्या परीक्षेत शाळेच्या 9 विद्यार्थ्यांनी विशिष्ट प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून, उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे अध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष शाहीद काझी, सचिव रेहान काझी, कार्यकारी प्रमुख आस्मा काझी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जावीद पठाण, डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समिउल्ला शेख यांनी अभिनंदन केले.