अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ.जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म.अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा करण्यात आला. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाचे वितरण करुन गुलाबपुष्प व फुगे वाटप करण्यात आले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फैय्याज शेख, अध्यक्षा डॉ. आसमा काझी, डॉ. जाकीर हुसेन शाळेचे मुख्याध्यापक समीउल्ला शेख, म.अल्ताफ इब्राहिम शाळेचे मुख्याध्यापक जाविद पठाण आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात समीउल्ला शेख यांनी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याचे कार्य शाळेच्या माध्यमातून केले जात असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. डॉ. आसमा काझी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.