• Wed. Dec 11th, 2024

मुंबईच्या विमानतळावर अवतरली चंद्रमुखी

ByMirror

Apr 30, 2022

स्पाईसजेटच्या विमानावर चंद्रमुखीचे पोस्टर झळकवून मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्धीचा पहिलाच प्रयोग

मुंबई (प्रतिनिधी)- ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत असताना चक्क मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावण्यवती चंद्रमुखी अवतरली होती. विमानतळ एकदम गजबजून गेले. या उत्साही वातावरणात आपल्या साजशृंगार, मोहमयी नजाकती, अदांनी चंद्रा उपस्थितांना घायाळ केले. चंद्राने सादर केलेल्या या नृत्यात हवाईसुंदरींनीही ठेका धरला. मराठी सिनेसृष्टीत एखाद्या चित्रपटाला अशा प्रकारे प्रसिद्धी देण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. स्पाईसजेटच्या विमानावर चंद्रमुखीचे पोस्टरही झळकले.


सध्या सर्वत्र प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखीचीच हवा आहे. पुण्यातील मेट्रोमध्ये प्रवाशांना आपल्या सूरतालात दंगवल्यानंतर आता चंद्राने विमानतळावर आपला जलवा सादर केला. या दरम्यान चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर आणि दौलतराव देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारे यांनी चंद्रमुखी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहनही केले. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अन्य प्रमुख कलाकार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *