• Wed. Dec 11th, 2024

मुंगसेवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शुजचे वाटप

ByMirror

Jul 16, 2022

चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने वळदगाव (ता. श्रीरामपूर) येथील मुंगसेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शुजचे वाटप करण्यात आले. समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चांना फाटा देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
संघर्ष समितीचे जिल्हा संघटक दिलीप शेंडे व उत्तर जिल्हाध्यक्ष संजय दळवी यांच्या प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अशोक भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे चेअरमन रामराव शेटे, नायब तहसीलदार अमोल एडके, नायब तहसीलदार दाभाडे, मेजर कृष्णा सरदार, पंढरीनाथ मुंगसे आप्पा, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


सरपंच अशोक भोसले म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षित झाल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे त्यांना मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सोसायटीचे चेअरमन रामराव शेटे यांनी जिल्हा परिषद शाळेला सर्व परीने सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

अमोल एडके नायब तहसीलदार, मेजर कृष्णा सरदार यांनी शाळेची प्रगती पाहून भारावले. उपस्थित पाहुण्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करुन शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय गोपाळे, पंढरीनाथ मुंगसे आप्पा, संदीप भोसले, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ भोसले, संचालक संजय गोपाळे, अमोल भोसले, सैनिक त्रिदल सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार, पंढरीनाथ पुजारी मेजर, विलासराव खर्डे, अनिलराव पुजारी, विजया शिंदे,संगीता वायदंडे, संजयजी दळवी, अमोल एडके नायब तहसीलदार, आबासाहेब डोळस, जगन्नाथ तेलोरे, संतोषजी देवराय, रामनाथ सोनवणे आदींसह चर्मकार संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


ग्रामपंचायत वळदगाव यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. उपाध्यापक अमोल गट यांनी शाळेची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शेंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *