रिपाईच्या वतीने चादरची मिरवणुक
संदल-उरुस मध्ये सहभागी होऊन हिंदू-मुस्लिम बांधवांनी घडविले धार्मिक ऐक्याचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मिस्किन मळा येथील हजरत सय्यद सहाब पीर दर्गाच्या संदल-उरुस उत्साहात साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पारंपारिक वाद्यांसह चादरची मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले.
टिव्ही सेंटर परिसर व मिस्किन मळा परिसरातून मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी रिपाईचे शहर उपाध्यक्ष जाहिद अली सय्यद, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, तृतीय पंथीयांचे अध्यक्ष काजल गुरु, रजा अली सय्यद, बिलाल अली सय्यद, बल्लू सचदेव, विशाल राणा, फरमान अली सय्यद आदींसह युवक व महिला उपस्थित होत्या.
दर्गावर चादर अर्पण करुन सुख, समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. संदल-उरुस निमित्त दर्गाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दर्शनासाठी सर्व धर्मिय भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भाविकांसाठी आयोजन करण्यात आले होते.