अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक व श्री मार्कंडेय माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक रामदिन, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, ग्रंथपाल विष्णू रंगा, सुचिता म्याना, सेवक वर्ग अजय न्यालपेल्ली, सुहास बोडखे, सरोजिनी आतकरे, पुष्पा म्याकल आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले. जात, धर्म, पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन, समता व बंधुत्व प्रस्थापित केले. त्यांच्या विचाराने समाजाची प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले -बाळकृष्ण सिद्दम