गाव तेथे वड अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
उदरमलला वृक्षरोपण अभियान
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिक गाव तेथे वड अभियान राबवित असून, गावोगावी मोठ्या संख्येने वडाच्या झाडांची लागवड केली जात आहे. या अभियानातंर्गत फाऊंडेशनच्या वतीने उदरमल (ता. नगर) येथील महादेव मंदिर परिसर व रस्त्याच्या दुतर्फा पंचक्रोशीच्या गावातील सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान राबवून वडांची झाडे लावण्यात आली.
या वृक्षरोपण अभियानाप्रसंगी डोंगरवाडीचे सरपंच उद्धव गिते, धारवाडीचे सरपंच बापूसाहेब गोरे, चिचोंडीचे उपसरपंच प्रमोद जर्हाड, शिराळाचे सरपंच पिनू मुळे, उपसरपंच आसाराम आव्हाड, डमळवाडीचे सरपंच रामनाथ शिरसाठ, उदरमलचे सरपंच योसेफ भिंगारदिवे, उपसरपंच नवनाथ पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, मेजर शिवाजीराव गर्जे, मेजर शिवाजीराव पठाडे, महादेव शिरसाठ, नंदू पालवे, वनविभागाचे संजय पालवे, जय भगवान मित्र मंडळाचे प्रशांत पालवे, विक्रम पालवे, बाबाजी आव्हाड, संजय पालवे, रोहित आव्हाड, जालिंदर पालवे, ऋषिकेश गिते, अमोल पालवे, दिपक पालवे, सामाजिक कार्यकर्ते नंदू पालवे, अभिषेक आव्हाड, रोहित आव्हाड, संतोष पालवे, ऋषिकेश पालवे, महेश आव्हाड, विजय पालवे, रणजीत पालवे, अंबाशेठ भिंगारदिवे, सिंदबाद पालवे आदी उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले की, जय हिंद फाउंडेशनच्या वतीने गाव तेथे वड अभियानद्वारे जिल्ह्यातील 25 गावांमध्ये वटवृक्ष लागवडीची मोहिम सुरु आहे. अनेक गावात डोंगर, उजाड माळरान, वाडी-वस्ती व मंदिर परिसरात वडांची झाडे लावण्यात आली आहे. ही झाडे वातावरणातील कार्बनडॉय ऑक्साईड शोषून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व सावली देणार आहे. तसेच पर्यावरणाचे समतोल साधले जाऊन निसर्गचक्र सुधारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित सर्व सरपंच व उपसरपंच यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन आपल्या गावात देखील हे अभियान राबवून झाडाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. उपस्थितांचे आभार मेजर शिवाजी गर्जे यांनी मानले.