• Wed. Dec 11th, 2024

माजी सैनिकांचे तोफखाना पोलीस स्टेशनला वृक्षरोपण

ByMirror

Jul 30, 2022

जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम

लावलेली झाडे पोलीसांनी घेतली दत्तक

अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी तोफखाना पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण अभियान राबविले. माजी सैनिक व पोलीसांनी मोठ्या उत्साहात या अभियानात सहभाग घेतला होता. लावण्यात आलेली ही झाडे पोलीसांना दत्तक देण्यात आली असून, त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी तोफखाना पोलीसांनी स्विकारली आहे.


अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षरोपणाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्‍वास भान्सी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर,नितीन रणदिवे, समाधान सोळंकी, सहाय्यक फौजदार रंगनाथ राठोड, बाळू आडगळे, सहाय्यक फौजदार अनिल आढाव, रणजीत बारगजे, सुनील शिरसाठ, संतोष गर्जे, अमोल आव्हाड, गिरीश केदार, दत्तात्रय शिरसाठ, आप्पा तरटे, संभाजी बडे, मुरली आव्हाड, संपदा तांबे, जिजाबाई खुडे, सतीश भवर, श्रीनिवास देशमुख, विनोद गिरी, श्रद्धा शेलार, मनीषा पवार आदी उपस्थित होते. जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब देशमाने, संतोष शिंदे, शिवाजी पठाडे, भगवान डोळे, संजू ढाकणे, कुशल घुले, कैलास पांडे, बाबासाहेब भवर, निळकंठ उल्हारे, अशोक मुठे, बाबासाहेब चौधरी, दादाभाऊ बोरकर, सखाराम नांगरे आदी उपस्थित होते.


शिवाजी पालवे यांनी जिल्ह्यातील गावोगावी जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिक वृक्षरोपण अभियान राबवून पर्यावरण संवर्धानासाठी आपले योगदान देत आहे. माजी सैनिकांनी उजाड माळरान, डोंगर रांगा, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली असून, त्याचे संवर्धन देखील केले जात असल्याचे स्पष्ट केले.


अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस दलाचा देखील सहभाग राहणार असून, माजी सैनिकांनी जिल्हाभर राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी म्हणाल्या की, वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धन होणार असून, या चळवळीत सर्वसामान्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. देश रक्षणाचे कर्तव्य बजावणारे माजी सैनिकांचे पर्यावरण चळवळीतील योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाभर सुरु असलेल्या वृक्ष चळवळीत योगदान देण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *