अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांमध्ये स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अमदनगर व श्रीदीप हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आठ दिवसीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, सचिव विपुल शहा, खजिनदार सुनील छाजेड यांनी केले आहे.
रविवारी (दि.6 मार्च) सकाळी 10 वाजता नगर-पुणे रोड, अहमदनगर महाविद्यालय जवळील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये या शिबीराचे शुभारंभ होणार आहे. हे शिबीर दि.13 मार्च पर्यंत चालणार असून, यामध्ये हिमोग्लोबिन, मधुमेह, हाडांचा ठिसूळपणा, स्तन कॅन्सर, गर्भाशय पिशवीचा कॅन्सरबाबत तपासणी करुन रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. या आजाराशी निगडीत काही काही तपासण्या मोफत तर काही खर्चिक तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी तसेच भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी वेळेवर तपासण्या करुन उपचार घेणे आवश्यक असून, या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या शिबीरात महिलांची तपासणी स्त्री रोग तज्ञ डॉ. मीरा बडवे, डॉ. अनघा पारगावकर, डॉ. सिमरन वधवा करणार आहेत.