अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी टीव्ही सेंटर येथील अहमदनगर महापालिकेचे निवृत्त गुणवंत कर्मचारी किरण रमेश सब्बन (वय 70 वर्षे) यांचे गुरुवार दि. 19 मे रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचे होते. महानगरपालिकेत आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाने त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यांचे अद्यावत कार्य आणि रेकॉर्ड ठेवण्याची अत्यंत सुरेख पध्दत सर्वांना सुपरिचित होती. ते क्रिकेटचे शौकीन असल्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्व बारकावे त्यांना माहित होते. त्यांनी संग्रह केलेल्या क्रिकेटच्या माहितीचे रेकॉर्ड पाहण्यासारखे आहे. उत्कृष्ट अक्षर लेखन व चित्रकलेतही ते पारंगत होते. प्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांचे ते चाहते होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त ते गायनाचा उपक्रम घेत असत. तर मोहंमदी रफी यांच्या आवाजात ते हुबेहुब गात असत.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माजी नगराध्यक्ष विद्याधर बुभाजी चन्ना यांचे ते जावई होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिण, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.