• Wed. Dec 11th, 2024

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

ByMirror

May 26, 2022

फिनिक्सच्या माध्यमातून बोरुडे यांनी दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमय केले -दादाभाऊ कळमकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीर तसेच नेत्रदान चळवळीत सक्रीय योगदानाबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव करण्यात आला.


सहकार सभागृह येथे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, विशाल गणपती देवस्थानचे सचिव अशोक कानडे, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, सुभाष लोंढे, प्रवक्ते नागेश गवळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, तालुकाध्यक्ष रामदास फुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.


दादाभाऊ कळमकर म्हणाले की, दृष्टीदोष असलेल्या दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचे काम जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून केले. कोणतेही राजकीय व शासकीय पाठबळ नसताना पाटबंधारे विभागात कार्यरत राहून स्वखर्चाने त्यांनी सर्वसामान्यांसाठी चालवलेली चळवळ प्रेरणादायी आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांची गरज ओळखून निशुल्क आरोग्य व नेत्र शिबीर घेऊन त्यांना आधार देण्याचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. अंबादास गारुडकर यांनी प्रास्ताविकात समता परिषदेच्या कार्याची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक संपत शिंदे म्हणाले की, नेत्रदान व अवयवदान ही समाजासाठी काळाची गरज बनली आहे. फिनिक्स फाऊंडेशनने नेत्रदान व अवयवदानसाठी जिल्ह्यात सुरु केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रा. माणिक विधाते व भगवान फुलसौंदर यांनी माणुसकीच्या भावनेने सुरु असलेल्या फिनिक्सच्या आरोग्य सेवेचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *