विविध राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात साकारल्या भूमिका
अहमदनगर (प्रतिनिधी)- धनगर समाजावरील अन्याय अत्याचारा विरुद्ध प्रकाश झोत टाकणारा राष्ट्रीय पुररकार विजेता चित्रपट ख्खाडा व इतर मराठी चित्रपटातील कलाकार तथा भाजपा कामगार आघाडीचे पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांचा आमदार गोपिचंद पडळकर यांनी सत्कार केला.
ढवळपुरी (ता. पारनेर) येथे झालेल्या एका राजकीय कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी भाजपा नेते सुर्यकांत पवार, विश्वनाथ कोरडे, बबनराव डावखर, डॉ. अभिजित रोहोकले, डॉ. राजेंद्र भनगडे, विश्वास रोहोकले, मनोहर पारखे, कुशाहरी भांड आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार पडळकर देखील एक सिनेकलावंत असून, त्यांच्या हस्ते सत्कार झाल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना आंबेडकर यांनी व्यक्त केली. आंबेडकर हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी ते एक उत्कृष्ट कलाकार असून, त्यांनी यापुर्वी राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट वास्तुपुरुष, कोती, शुभमंगल सावधान, सासुबाई गेल्या चोरीला, व्हीआयपी गाढव, कोरठणचा खंडेराया, ट्राफीक जाम, राजकारण आदी अनेक चित्रपटात व मालिका मधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते दादासाहेब जगताप निर्मित अंधेरी इस्ट बॉम्बे मेरी जान याहिन्दी चित्रपटात खलनायकाची मुख्य भूमिका करत आहे.